ब्रेकिंग न्यूज – पार्थ पवार मावळचे उमेदवार – शरद पवार

ब्रेकिंग न्यूज – पार्थ पवार मावळचे उमेदवार – शरद पवार

पुणे – राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार हे मावळचे उमेदवार असल्याची घोषणा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. पुण्याततील पत्रकार परिषदेत पवार यांनी ही घोषणा केली आहे. त्यामुळे आता मावळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याबाबतचा राष्ट्रवादीचा तिढा सुटला असल्याचं दिसत आहे.

दरम्यान गेली काही दिवसांपासून पार्थ पवार यांनाच मावळमधून उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा होती. राष्ट्रवादीच्या स्थानिक कार्यकर्त्यांनीही पार्थ यांच्याच नावाला पसंती दिली होती. त्यामुळे आज अखेर शरद पवार यांनी पार्थ पवार यांनाच मावळमधून उमेदवारी दिली जाणार असल्याची घोषणा केली आहे.

COMMENTS