त्यामुळे मनसे आघाडीत नसणार – शरद पवार

त्यामुळे मनसे आघाडीत नसणार – शरद पवार

नाशिक – मनसेला आघाडीत जागा नाही असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. निवडणुकांवर बहिष्कार घाला ही राज ठाकरे यांची भूमिका आहे ती आघाडीला मान्य नसल्यामुळे मनसे आघाडीत नसणार असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.सर्वांनी ईव्हीएमवर बहिष्कार घालावा, अशी राज ठाकरेंची भूमिका होती.  कुठल्याही पक्षाने त्यांची ही भूमिका मान्य केली नाही. राजकीय पक्षाला निवडणुकीवर बहिष्कार घालणं परवडणारं नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान आगामी विधानसभा निवडणूक लढव्यची की नाही याबाबत मनसेचं अजून मनसेचं ठरलं नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज ठाकरे निवडणूक लढण्यासंदर्भात उत्साही नाहीत. त्यामुळे निर्णय होत नसल्याने पदाधिकारी अस्वस्थ आहेत, असंही सांगण्यात येत आहे.

COMMENTS