मनसेला महाआघाडीत सामिल करण्याबाबत शरद पवारांचं स्पष्टीकरण !

मनसेला महाआघाडीत सामिल करण्याबाबत शरद पवारांचं स्पष्टीकरण !

पंढरपूर –  आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सामिल करण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज अखेर स्पष्टीकरण दिलं आहे. राज ठाकरे काही प्रश्नांवर आमच्या सोबत असतील, मात्र आगामी निवडणुकीत ते आमच्यासोबत नसतील असं पवार यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता मनसेला महाघाडीत सामिल करुन घेण्याबाबत पूर्णविराम मिळाला आहे.

दरम्यान गेली काही दिवसांपासून मनसेला महाआघाडीत सामिल करुन घेतलं जाणार असल्याची चर्चा होती. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनीदेखील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर भेट घेतली होती. त्यामुळे मनसे महाआघाडीत सामिल होणार, असंच चित्र निर्माण झालं होतं.तर दुसरीकडे मनसे अधयक्ष राज ठाकरे देखील आपल्या व्यंगचित्रांच्या माध्यमातून मोदी सरकारवर निशाणा साधत होते. त्यामुळे ते महाआघाडीत सामिल होतील असंच बोललं जात होतं. परंतु या सर्व चर्चांना आज अखेर शरद पवार यांनी पूर्णविराम दिला आहे.

 

COMMENTS