महाराष्ट्रातही ऑपरेशन लोटस सुरु होईल का?, शरद पवार म्हणाले…

महाराष्ट्रातही ऑपरेशन लोटस सुरु होईल का?, शरद पवार म्हणाले…

मुंबई – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर पवार यांनी मध्य प्रदेशातील राजकीय स्थितीवर भाष्य केलं.मध्य प्रदेशप्रमाणेच महाराष्ट्रातही परिस्थिती उद्भवेल का ? असा प्रश्नही पवारांना विचारण्यात आला. तेव्हा, ‘महाराष्ट्रात असं काहीही होणार नाही. मला जी माहिती आहे त्यानुसार या राज्यात अशी स्थिती येणार नाही. पाच वर्षे हे सरकार चालेल’, असं उत्तर पवारांनी दिलं. मध्य प्रदेशमधील राजकीय घडामोडीबाबत कमलनाथ यांच्यावर त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे.

दरम्यान कमलनाथ यांच्या नेतृत्वावर सगळ्यांचा विश्वास आहे. ते चमत्कार करू शकतात असं लोकांना वाटत आहे. त्यामुळे बघुया दोन दिवसांत काय होतं ते. असही पवार म्हणाले. तसेच कमलनाथ हे विश्वासदर्शक ठराव जिंकतील असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान शरद पवार यांनी आज राज्यसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. परंतु राष्ट्रवादीच्या दुसऱ्या उमेदवार फौजिया खान यांनी मात्र उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे त्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत. राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सात जागांसाठी 26 मार्चला निवडणूक होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख शुक्रवार 13 मार्च आहे. संख्याबळानुसार महाविकास आघाडीचे चार, तर भाजपचे तीन उमेदवार निवडून येऊ शकतात. राष्ट्रवादी दोन तर काँग्रेस-शिवसेना प्रत्येकी एक जागा लढणार असल्याचं बोललं जात होतं.परंतु काँग्रेस चौथ्या जागेसाठी अजूनही आग्रही असल्यामुळे याबाबत समन्वय समितीची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत यावर तोडगा निघण्याची शक्यता आहे

COMMENTS