नारायण राणेंच्या आत्मचरित्रावर शरद पवारांची प्रतिक्रिया !

नारायण राणेंच्या आत्मचरित्रावर शरद पवारांची प्रतिक्रिया !

सातारा – नारायण राणे यांनी लिहिलेल्या आत्मचरित्रावर   राष्टेरवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी पुस्तक वाचले नाही. यावर आत्ताच बोलणार नाही, पुस्तक वाचून सविस्तर प्रतिक्रिया देईन, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. ‘No Hold Barred : My Years in Politics’ नावाचे राणे यांनी आत्मचरित्र लिहले आहे. राणे यांच्या आत्मचरित्रावर जोरदार चर्चा रंगली आहे.

दरम्यान आपल्या आत्मचरित्रात राणे यांनी अनेक खुलासे केले आहेत. शरद पवार यांचाही यामध्ये त्यांनी उल्लेख केला आहे.  ‘मातोश्री’ बॉम्बने उडवून अज्ञातांचा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या हत्येचा कट होता. याबाबत पवार यांनी उद्धव ठाकरेंना माहिती दिल्यानंतर ठाकरे कुटुंबानं मातोश्री सोडली होती असा दावा केला आहे. याबाबत पवारांना विचारले असता  मी पुस्तक वाचले नाही. यावर आत्ताच बोलणार नसल्याचही पवारांनी म्हटलं आहे.


COMMENTS