‘राफेल’वरुन शरद पवारांनी केली पंतप्रधान मोदींची पाठराखन !

‘राफेल’वरुन शरद पवारांनी केली पंतप्रधान मोदींची पाठराखन !

पुणे – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राफेल विमानांच्या खरेदीवरून पंतप्रधान मोदींची पाठराखण केली आहे. नरेंद्र मोदींच्या हेतूबाबत लोकांच्या मनात अजूनही शंका नसल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे. विमानाची तांत्रिक माहिती जाहीर करण्याची विरोधकांची मागणीही योग्य नसल्याचं मत पवार यांनी व्यक्त केलं आहे. तसेच राफेलच्या किंमतीबाबत मात्र सरकारनं माहिती दिली पाहिजे अशी मागणीही पवार यांनी केली आहे. त्याबरोबर विमानाच्या तांत्रिक गोष्टींची माहिती उघड करणं ही विरोधकांची मागणीही योग्य नसल्याचं पवारांनी म्हटलं आहे.

दरम्यान राफेलच्या मुद्यावरून काँग्रेसने सध्या अत्यंत आक्रमक भूमिका घेतलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चौकीदार नाही तर चोर आहेत. देशाला त्यांनी धोका दिलाय. फ्रान्सच्या माजी अध्यक्षांनीही मोदींना चोर म्हटलंय अशी घणाघाती टीका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली होती. ‘न्यूज18 लोकमत’ला दिलेल्या पवारांनी हे वक्तव्य केलं आहे.

 

COMMENTS