अभी तो मै जवान हू, ‘सर्वांना घरी पाठवूनच, मग मी घरी जाणार” शरद पवारांनी घेतली राष्ट्रवादीच्या नेत्याची फिरकी!

अभी तो मै जवान हू, ‘सर्वांना घरी पाठवूनच, मग मी घरी जाणार” शरद पवारांनी घेतली राष्ट्रवादीच्या नेत्याची फिरकी!

अकोला – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या पक्षातील नेत्याची फिरकी घेतली आहे. “अभी तो मै जवान हू, ‘सर्वांना घरी पाठवूनच, मग मी घरी जाणार असल्याचं म्हणत शरद पवारांनी त्यांच्या वयाचा उल्लेख करणाऱ्या नेत्यांची फिरकी घेतली आहे. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने शरद पवार आज अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. जिल्ह्यातील वाडेगाव येथे आयोजित सभेत ते बोलत होते.

दरम्यान यावेळी व्यासपीठावर उपस्थित नेत्यांनी पवारांच्या वयाचा उल्लेख केल्यानंतर पवारांनी त्यांची चांगलीच फिरकी घेतली आहे. ‘अभी तो मै जवान हू. सर्वांना घरी पाठवूनच, मग मी घरी जाणार. माझ्या वयाबद्दल बोलू नका, मी तुमच्या पक्षाचा अध्यक्ष आहे, असं पवार म्हणाले आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने शरद पवार यांची राज्यात ठिकठिकाणी प्रचारसभा सुरु आहेत. कालपासून त्यांच्या दौऱ्याला सुरुवात झाली आहे. शरद पवार यांनी काल पारनेर मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. त्यानंतर आज ते अकोला जिल्ह्याच्या दौय्रावर आहे.

COMMENTS