मी देशात कुठेच नॉनव्हेज खात नाही, फक्त इथे आलोकी आवर्जून खातो – शरद पवार

मी देशात कुठेच नॉनव्हेज खात नाही, फक्त इथे आलोकी आवर्जून खातो – शरद पवार

कोल्हापूर – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार हे राजकारणाबरोबरच एक  चांगले खवय्येही असल्याच दिसून आलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून देशभर फिरत असताना मी कोठेच नॉनव्हेज खात नाही. परंतु कोल्हापूर आणि सातारा येथे आलो की आवर्जून नॉनव्हेज खातो, असं  शरद पवार यांनी म्हटलं आहे.

खासदार धनंजय महाडिक यांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनानंतर महाडिक यांच्या निवासस्थानी अनौपचारिक गप्पा मारताना शरद पवार यांनी हे वक्तव्य केलं आहे.संसदीय उपनेते म्हणून निवड केलेल्या खासदार धनंजय महाडिक यांनी शरद पवार यांच्यासाठी शनिवारी दुपारी जेवणाचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, आर. के. पोवार, उद्योगपती व्ही. बी. पाटील उपस्थित होते.

दरम्यान देशातील साखर उद्योग अनेक अडचणींचा सामना करत आहे. आम्ही सत्तेत असताना दौरा करून आल्यानंतर किंवा शिष्टमंडळ भेटून गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी शासन निर्णय काढत असू. परंतु आता मात्र ही प्रक्रिया दिसत नसल्याचेही यावेळी शरद पवार यांनी म्हटलं आहे.

COMMENTS