धनंजय मुंडे आणि पंंकजा मुंडेंच्या वादावर शरद पवार म्हणाले…

धनंजय मुंडे आणि पंंकजा मुंडेंच्या वादावर शरद पवार म्हणाले…

मुंबई – गेली दोन दिवसांपासून परळी मतदारसंघात राजकीय वातावरण तापलं आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय मुंडे आणि भाजप उमेदवार पंंकजा मुंडे यांच्यामधील वाद चिघळला आहे. या वादावरच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिल्यांदा भाष्य केलं आहे. मी काल टीव्हीवर पाहिलं. आमच्या विधानपरिषदेच्या विरोधीपक्ष नेत्यावर आरोप झाले. धनंजय मुंडे यांनी त्यांच्या विरोधी उमेदवाराचा उल्लेख बहिणाबाई केला आणि तो उल्लेख केला म्हणून त्यांना चक्कर आली. पंकजा मुंडे यांना महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अभ्यास नसावा. बहिणाबाई हे महाराष्ट्राच्या साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात मानाचं स्थान आहे. त्यामुळे बहिणाबाई म्हटल्यामुळे त्यांना चक्कर आली हे आश्चर्याचं असल्याचं म्हणत त्यांनी पंकजा मुंडेंना टोला लगावला आहे.

दरम्यान भाजपाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्याविषयी बोलताना राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी अर्वाच्च भाषेत टीका केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. याबाबतही पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी धनंजय मुंडेंचे स्टेमेंट ऐकलं त्यामध्ये ते मोडतोड करुन वापरल्याची तक्रार त्यांनी केली आहे. एक गंमत वाटते राज्य महिला आयोगाने लगेच याची दखल घेत यावर कारवाई करण्याचे संकेत दिले. महिला आयोग ही स्वतंत्र आयोगं आहेत. मात्र तिथे आपण भाजपाचे प्रतिनिधी म्हणून बसलोय हे दरवेळी दाखवण्याची गरज नसते असंही पवार यांनी म्हटलं आहे.

COMMENTS