पार्थ पवारांच्या अडखळलेल्या पहिल्या भाषणावर शरद पवारांची प्रतिक्रिया !

पार्थ पवारांच्या अडखळलेल्या पहिल्या भाषणावर शरद पवारांची प्रतिक्रिया !

बारामती –  राष्ट्रवादीचे मावळ लोकसभेचे उमेदवार पार्थ पवार यांच्या पहिल्या भाषणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ठेचा लागून माणसं शहाणी होतात, असं पवारांनी म्हटलं आहे. तसेच पार्थ पवारला भाषणाबाबत काहीही सल्ला देणार नाही. सुरुवातीला ठेचा लागतात. नंतर माणसं शहाणी होतात असं पवारांनी म्हटलं आहे.

दरम्यान बारामतीत शरद पवारांना पार्थबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. पार्थ पवारांच्या प्रचारासाठी मावळमध्ये सभा घेण्यात आली होती. त्यामध्ये त्यांचं पहिलं भाषण झालं. लिहून आणलेलं भाषणही न वाचता आल्यामुळे पार्थ पवारांची गोची झाली होती.त्यामुळे पार्थ यांच्या पहिल्या भाषणावर विरोधकांनी जोरदार टीका केली होती. त्यानंतर पवारांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

COMMENTS