पार्थ पवारांच्या ट्वीटवर काय म्हणाले शरद पवार?, नाव न घेता फटकारले!

पार्थ पवारांच्या ट्वीटवर काय म्हणाले शरद पवार?, नाव न घेता फटकारले!

पुणे – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा पार्थ यांचे नाव न घेता त्यांना फटकारले आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर पार्थ पवार यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्याचे संकेत दिलेत. त्यावर शरद पवार म्हणाले मराठा आरक्षण प्रश्नावर सरकार कोर्टात गेलं आहे. त्यावरही आणखी कुणी जात असेल तर जावं, दहा जणांनी जावं असं म्हणत त्यांनी फटकारलं आहे. तसेच सुप्रीम कोर्टात स्थगिती उठवणे हे गरजेचं आहे. घटना पीठाकडे सुनावणी जावी यासाठी सरकार आग्रही असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. साखरेच्या प्रश्नावर आज पुण्यात बैठक झाली होती. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

दरम्यान साखरेला जितकी किंमत मिळते तितकीच इथेनॉलमधून मिळेल. वेळही कमी लागतो इथेनॉल निर्मितीला.एकीकडे शेतकऱ्यांना मोकळीक दिली म्हणतात तर दुसरीकडे कांदा निर्यात बंदी केली यात विसंगती असल्याचंही पवारांनी म्हटलं आहे. यंदाच्या वर्षी ऊसाचे उत्पादन वाढणार आहे. गाळप कसं करायचं हा यक्ष प्रश्न आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेला उठाव नाही. म्हणून  यंदा 25 ते 30 टक्के साखर उत्पादन कमी करून इतकं इथेनॉल बनवायचे असा निर्णय घेतला आहे. मोदींनीही इथेनॉल बाबत धोरण जाहीर केलं ते परवडणारे असल्याचंही पवार म्हणाले.

COMMENTS