पार्थ पवार यांच्या उमेदवारीबाबत शरद पवार काय म्हणाले ?

पार्थ पवार यांच्या उमेदवारीबाबत शरद पवार काय म्हणाले ?

पुणे – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार हे मावळमधून लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती. परंतु याबाबत स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आज झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बैठकीत मावळ मतदारसंघात पार्थ पवार यांच्या उमेदवारीसाठी शरद पवार अनुकूल नसल्याचे दिसून आहे. पवार घराण्यातील सगळ्यांनी निवडणूक लढवली तर पक्ष बांधणी करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार असा प्रश्न यावेळी शरद पवार यांनी उपस्थित केला. त्यामुळे पार्थ यांना आगामी निवडणुकीच्या मैदानात उतरवलं जाणार नसल्याचं पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान एका  खाजगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये अजित पवार यांनी आपल्या मुलांनी राजकारणात येऊ नये अशी आपली इच्छा आहे. मात्र आजची पिढी त्यांना हवा तो निर्णय घेऊ शकतात असं म्हटलं होतं. त्यावरुन जर पक्षाने सांगितलं तर पार्थ लढवू शकतात असे संकेत अजित पवार यांनी दिले होते. परंतु आजच्या बैठकीत शरद पवार यांनी पार्थ यांना उमेदवारी देण्याबाबत स्पष्ट मत मांडलं आहे.

पुण्यात आज राष्ट्रवादीची लोकसभा निवडणूक आढावा बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील लोकसभा मतदारसंघातून कोणाला कुठून उमेदवारी दिली जाणार यावर चर्चा करण्यात आली आहे.

COMMENTS