या वयात हे असं वागणं बरं नव्हे, नरेंद्र मोदींना शरद पवारांचं प्रत्युत्तर !

या वयात हे असं वागणं बरं नव्हे, नरेंद्र मोदींना शरद पवारांचं प्रत्युत्तर !

पंढरपूर – या वयात असं वागणं बरं नव्हे, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या टीकेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे. शरद पवार आज माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार संजय शिंदे यांच्या प्रचारासाठी सांगोला तालुक्यातील कोळा येथे आले होते. त्यावळी बोलत असताना त्यांनी मोदींलर टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारसभेत सातत्याने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर वैयक्तिक आरोप केले होते. त्यामुळे या वयात असं वागणं बरं नव्हे, असं पवारांनी म्हटलं आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसात नरेंद्र मोदी वारंवार प्रचारासाठी महाराष्ट्रात येत आहेत. मात्र त्यांनी केलेल्या कामांच्या प्रचारापेक्षा ते माझ्याच घरावर जास्त बोलत आहेत. मात्र त्यांना घराचा काय अनुभव आहे, असा टोला पवारांनी लगावला आहे. माझ्या कुटुंबाचा बारदाना मोठा आहे. हा फकीर याला घर कसले, निदान आम्हाला तरी दिसले नाही. आता दिल्लीत गेल्यावर त्याला सांगेन या वयात लोकाच्या घराच्या चौकशा करणं बरं नव्हे असा टोला पवारांनी लगावला आहे.

COMMENTS