शरद पवारांचे प्रकाश आंबेडकरांना उत्तर !

शरद पवारांचे प्रकाश आंबेडकरांना उत्तर !

मुंबई – प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करणार नसल्याचं वक्तव्य काल केलं होतं. शरद पवार धर्मनिरपेक्ष आहेत, मात्र त्यांचा पक्ष धर्मनिरपेक्ष नाही.2014 ला निवडणुकीनंतर शिवसेना भाजपाला पाठिंबा द्यायला तयार नव्हते. तेव्हा राष्ट्रवादीने आमदारांच्या दबावाखाली सरकारला बाहेरून पाठिंबा दिला. त्यामुळे राष्ट्रवादीबरोबर जाण्यात आम्हाला अडचण असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.त्यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अखेर मौन सोडलं आहे. राष्ट्रवादी धर्मनिरपेक्ष नसता तर अकोल्यात दोन निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतला नसता. तिथे शरद पवार प्रचाराला गेले नव्हते तर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते, ते धर्मनिरपेक्ष आहेत असं तेव्हा वाटत होतं आता वाटत नाहीत असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे.

दरम्यान मला साल आठवत नाही पण ईशान्य मुंबईत आम्ही उभ्या केलेल्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी आंबेडकरांच्या पक्षाने नीलम गोऱ्हेंना उभं केलं होतं, त्याचा लाभ प्रमोद महाजन यांना झाला होता, महाजन तेव्हा भाजपात होते. तेव्हा भाजपाला लाभ पोहचवण्यासाठी उमेदवार उभे करण्याची ऐतिहासिक कामगिरी करणारे लोक इतरांना कोण धर्मनिरपेक्ष आहे नाही असं म्हणून चालत नसल्याचा टोलाही पवार यांनी लगावला आहे.

COMMENTS