शिरूरमधून अजित पवारांनी लढायची गरज नाही, माझ्याकडे सहा प्रबळ दावेदार – शरद पवार

शिरूरमधून अजित पवारांनी लढायची गरज नाही, माझ्याकडे सहा प्रबळ दावेदार – शरद पवार

पुणे – शिरुर आणि मावळ लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवाराबाब राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. शिरूरमधून अजित पवार यांनी लढायची आवश्यकता नाही. माझ्याकडे सहा प्रबळ दावेदार असल्याचं पवार यांनी म्हटलं आहे. तसेच माढा लोकसभा मतदारसंघातून मी निवडणूक लढवावी अशी मागणी विजय सिंह मोहिते पाटील यांनी केली आहे. मात्र माझी निवडणूक लढण्याची इच्छा नाही. परंतु याबाबत विचार करून सांगू असंही पवार यांनी म्हटलं आहे. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील बारामती हॉस्टेल येथे बैठक पार पडली. यानंतर ते बोलत होते.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत लोकसभेच्या अखेरच्या सत्रातील भाषण केले. या भाषणावर शरद पवार यांनी टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संसदेतील गुरुवारचे भाषण वाचनात आले. त्यांचे भाषण प्रथेला धरून नव्हते. त्यांच्यावर जसे संस्कार झाले, त्यानुसारच ते बोलले असल्याचं पवार यांनी म्हटलं आहे.

COMMENTS