पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे सत्ता स्थापनेचा गोंधळ आणखी वाढला!

पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे सत्ता स्थापनेचा गोंधळ आणखी वाढला!

नवी दिल्ली – राज्यात सत्ता स्थापनेचा गोंधळ आणखी वाढला असल्याचं दिसत आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. शिवसेनेलाच विचारा असे उत्तर शरद पवारांनी दिले आहे. तसेच सरकार स्थापनेसंदर्भात चर्चा सुरु आहे का याबाबत विचारले असता कसली चर्चा, कोणाशी चर्चा असंही पवार म्हणाले आहेत. य पवारांच्या या उत्तरामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

दरम्यान राज्यात गेल्या काही दिवसांपासून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचे सरकार स्थापन होणार अशी चर्चा आहे. असे असताना पवारांनी मात्र असे काही सुरुच नसल्याचे म्हटले आहे. शिवसेना-भाजप यांनी एकत्र निवडणूक लढवली आहे. ते वेगळे आहेत आणि आम्ही व काँग्रेस वेगळे आहोत. त्यांनी त्यांचा मार्ग निवडायचा आम्ही आमचे राजकारण करू, असे पवार म्हणाले आहेत. त्यामुळे राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सुटणार का नाही याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.

COMMENTS