सोनिया गांधींसोबतच्या बैठकीनंतर शरद पवारांची प्रतिक्रिया!

सोनिया गांधींसोबतच्या बैठकीनंतर शरद पवारांची प्रतिक्रिया!

नवी दिल्ली – काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज घेतली.10 जनपथ वरील सोनिया ही यांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली. या बैठकीनंतर शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महाशिवआघाडीचा कुठलाही किमान समान कार्यक्रम निश्चित नसल्याचं पवार यांनी म्हटलं आहे.

सध्या काँग्रेस राष्ट्रवादीबद्दलच आम्ही बोलतो. राज्यातील परिस्थितीची माहिती दिली.
राजकीय स्थितीवर लक्ष ठेवून राहणार आहे. आघाडीच्या मित्रपक्षांशी चर्चा करणार आहे. भाजपनं काय करायचं ते त्यांनी ठरवावं.शिवसेना काय बोलते यावर मी काय सांगू असंही पवार यांनी म्हटलं आहे. ज्याच्याकडे जास्त आकडे आहेत ते सरकार बनवत नाहीत असंही पवार यांनी यावेळी म्हटलं आहे. आजच्या बैठकीत शिवमहाआघाडीबाबत कोणताही ठोस निर्णय घेतला नसल्यामुळे महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा सस्पेन्स कायम आहे.

COMMENTS