सुप्रीम कोर्टापासून वस्तूस्थिती लपवण्यात आली, राफेलबाबत शरद पवारांचा दावा !

सुप्रीम कोर्टापासून वस्तूस्थिती लपवण्यात आली, राफेलबाबत शरद पवारांचा दावा !

मुंबई – राफेल कराराबात केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टापासून वस्तूस्थिती लपवण्यात आली असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. तसेच केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला असल्याचंही पवारांनी म्हटलं आहे. राफेल प्रकरणात मी सुप्रीम कोर्टाच्या निकालाची प्रत वाचली आहे. केंद्राने सुप्रीम कोर्टात दिलेल्या माहितीच्या आधारे निर्णय देण्यात आला. केंद्राच्या दाव्यानुसार कॅगच्या अहवालाची लोकलेखा समितीत चर्चा झाली होती. पण हा दावा चुकीचा असल्याचं पवारांनी म्हटलं आहे.

दरम्यान फ्रान्सकडून ३६ राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्याच्या कराराच्या न्यायालयीन चौकशीची मागणी करणाऱ्या सर्व याचिका सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी फेटाळल्या. ३६ राफेल विमानांच्या खरेदी कराराच्या संवेदनशील मुद्द्यात न्यायालयाने हस्तक्षेप करण्यासारखे कुठलेही कारण नसून या करारात कुठलीही अनियमितता व गैरप्रकार दिसून आलेला नाही.

भारतीय हवाई दलास प्रगत अशा लढाऊ विमानांची गरज आहे. शत्रू देशांकडे चौथ्या व पाचव्या पिढीतील लढाऊ विमाने असताना संरक्षण सिद्धतेत मागे राहून भारताला परवडणार नाही, असे सुप्रीम कोर्टाने सांगितले. त्यानंतर शरद पवार यांनी केंद्र सरकारनं वस्तुस्थिती लपवली असल्याचं म्हटलं आहे.

COMMENTS