भर पावसात शरद पवारांचे भाषण! VIDEO

भर पावसात शरद पवारांचे भाषण! VIDEO

सातारा – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापत आहे. नेत्यांच्या सभांमुळे तर आणखीनच या तापमानात भर पडत आहे. परंतु हे तापमान कमी करण्याचा प्रयत्न पाऊस करत असल्याचं दिसत आहे. कारण काही ठिकाणी होत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नेत्यांना आपल्या सभा रद्द कराव्या लागल्या. परंतु या पावसावरही राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मात केली असल्याचं दिसत आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघात आज शरद पवार यांची सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र, याठिकाणी जोरदार पाऊस पडत होता. परंतु या पावसातही शरद पवार यांनी कोणतीही पर्वा न करता भाषण ठोकले. तब्बल अर्धा तास पावसात उभे राहू शरद पवार यांनी फटकेबाजी केली. त्यामुळे शरद पवार यांचे अनोखे रुप सातारकरांना आज पाहायला मिळाले.

COMMENTS