देशाच्या सीमांचे संरक्षण करण्याची जबाबदारी आरएसएसच्या स्वयंसेवकांवर द्यावी – शरद पवार

देशाच्या सीमांचे संरक्षण करण्याची जबाबदारी आरएसएसच्या स्वयंसेवकांवर द्यावी – शरद पवार

देशाचे सीमांचे रक्षण करणारे आणि त्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावणा-या लष्कराच्या जवानांऐवजी सरकारने राष्ट्रीय स्वसंयसेवक संघाच्या स्वयंसेवकांकडे सीमांच्या रक्षणाची जबाबदारी द्यावी असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला  आहे. हातात काठ्या आणि हाफ पँट घालून दहशतवाद्यांचा सामना करण्याची जबाबदारी मोदी सरकारने त्यांच्यावर सोपवावी म्हणज्ये भागवतसाहेबांच्या म्हणण्यात किती तथ्य आहे हे देशाला कळेल असंही पवार म्हणाले.

देशात युद्धाची परिस्थिती निर्माण झाली तर सीमेवर जाण्यासाठी सैनिकांना अनेक महिने तयारी करावी लागते. मात्र हेच काम संघाचे स्वयंसेवक केवळ तीन दिवसात करतील असं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं होतं. त्यावरुन देशभर त्यांच्याव टीका सुरू आहे. देशाच्या सैनिकांचा अपमान असल्याची टीका मोहन भागवत यांच्यावर होत आहे. तसंच भागवत यांनी सैनिकांची आणि देशाची माफी मागावी अशीही मागणी होत आहे.

COMMENTS