आगामी निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी शरद पवारांनी सांगितला फॉर्म्युला !

आगामी निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी शरद पवारांनी सांगितला फॉर्म्युला !

मुंबई – आगामी निवडणुकीत भाजप आणि पंतप्रधान मोदींना पराभवाची धूळ चारण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून जोरदार प्रयत्न केले जात आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नवा फॉर्म्युला सांगितला आहे. जे भाजपासोबत नाहीत त्यांना सर्वांना आम्ही बरोबर घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ज्या राज्यामध्ये जो पक्ष पहिल्या क्रमांकावर आहे, त्या पक्षाला दुसरे पक्ष सहकार्य करतील. ज्यांचे सर्वाधिक खासदार असतील त्यांचा पंतप्रधानपदाचा उमेदवार असणार असल्याचं पवार यांनी म्हटलं आहे. मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक आज पार पडली. या बैठकीत पवार यांनी हा फॉर्म्युला सांगितला आहे.

दरम्यान राजकारणातील बदल स्वीकारण्यास तयार असणाऱ्या पक्षाला राष्ट्रवादीचा पाठींबा असणार असून असाच समजूतदारपणा सर्वांनी दाखवायला हवा. तसेच निवडणुकीपूर्वीच पंतप्रधानपदाचा उमेदवार देण्याची गरज नाही. उलट सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यायला पाहिजे असं पवार यांनी म्हटलं आहे. तसेच २००४मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांना इंडिया शायनिंग या मोहिमेद्वारे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून समोर आणण्यात आले. त्यावेळी आम्ही पंतप्रधानपदासाठी कोणालाही पुढे न करताही निवडणूक जिंकलो होतो. त्यानंतर एकत्र येत मनमोहन सिंग यांना पंतप्रधानपदी बसवले होते. त्यामुळे हे जरूरी नाही की आधीच पंतप्रधानपदाचे नाव निश्चित केले जावे असंही यावेळी शरद पवार यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS