राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सोहळा, राजकीय कारकिर्दीत शरद पवारांनी घेतली सोळाव्यांदा शपथ !

राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सोहळा, राजकीय कारकिर्दीत शरद पवारांनी घेतली सोळाव्यांदा शपथ !

नवी दिल्ली – राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सोहळा आज पार पडला. राज्यसभा सदनात पार पडलेल्या या शपथविधी सोहळ्यात
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही शपथ घेतली आहे. पवारांच्या या शपथविधीची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. या चर्चेचं कारण म्हणजे आपल्या राजकीय कारकिर्दीत पवारांनी 16 व्यांदा शपथ घेेतली आहे. सलग दुसऱ्यांदा राज्यसभेत
तर 6 वेळा विधानसभेत एकदा विधानपरिषद सदस्य, 7 वेळा लोकसभा सदस्य, तर दोनदा राज्यसभा सदस्य म्हणून शपथ घेतली आहे. त्यामुळे लोकशाहीच्या चारही सदनात प्रतिनिधित्व करणारे ते एकमेव नेते असल्याचं बोललं जात आहे.

पवारांच्या शपथविधीनंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्वीट केलं आहे. गेली 53 वर्ष एक दिवसाचाही खंड न पडता लोकशाहीच्या सर्वोच्च सभागृहांचे सदस्य असणारे पवार हे भारतातील एकमेव व्यक्ती असल्याचं पाटील यांनी म्हटलं आहे. दरम्यान, शरद पवार यांच्यासह भाजप नेते छत्रपती उदयनराजे भोसले, शिवसेना नेत्या प्रियांका चतुर्वेदी, भाजपचे भागवत कराड, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, काँग्रेस नेते राजीव सातव या महाराष्ट्रातील सहा खासदारांनी शपथ घेतली आहे.

उदयनराजे भोसलेंना राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडूंनी दिली समज

भाजप नेते छत्रपती उदयनराजे भोसले यांनी राज्यसभेच्या खासदारकीची पहिल्यांदाच शपथ घेतली. त्यांनी इंग्रजीतून शपथ घेतली यानंतर घोषणा दिली. यामुळे उपराष्ट्रपती आणि राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडू यांना उदयनराजे यांना समज द्यावी लागली. जय हिंद जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी घोषणा त्यांनी दिली होती. यावर व्यंकय्या नायडू म्हणाले की, ‘सदनातील नवीन सदस्यांना सांगतो की, हे रेकॉर्डवर जाणार नाही, फक्त तुमची शपथ नोंदवली जाणार आहे. सदनात कोणतीही घोषणा देता येणार नाही, हे भविष्यात लक्षात असू द्या’ अशा शब्दात व्यंकय्या नायडू यांनी उदयनराजे यांना समज दिली.

COMMENTS