मुख्यमंत्र्यांनीच सांगितले ईडीकडे जाऊ नका,   शरद पवारांचा गौप्यस्फोट!

मुख्यमंत्र्यांनीच सांगितले ईडीकडे जाऊ नका, शरद पवारांचा गौप्यस्फोट!

लातूर, उदगीर –  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. “ईडी की फिडी मला कोणी काही करत नाही. सगळ्यांचे फोन आले की असं करु नका. स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितले की ईडीकडे जाऊ नका” असा गौप्यस्फोट पवार यांनी केला आहे. लातूरमधील उदगीरच्या सभेत ते बोलत होते.

दरम्यान मोठ्या लोकांचे 70 हजार कोटींचे कर्ज माफ झाले. शेतकऱ्यांचे काय? असा प्रश्नही यावेळी पवार यांनी उपस्थित केला.  छत्रपतींच्या नावानं मत मागणाऱ्यांनी स्मारकाची एक वीटही रचली नाही. उलट छत्रपतींच्या किल्यावर छमछम सुरु करत आहेत. अरे छमछम करायची तर सोलापूरच्या मोडनिंबला जा. चांगली छमछम आहे.असा टोलाही यावेळी पवारांनी लगावला आहे.

तसेच मुख्यमंत्री म्हणतात आम्ही सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांना ५० हजार कोटी दिले. नुसती उचलली जीभ आणि लावली टाळ्याला. यांनी कर्जमाफी दिल्याचा पत्ता नाही म्हणूनच राज्यात १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. मुख्यमंत्री शेतकऱ्यांना लहान पोरंटोरं समजू लागले आहेत.

तसेच शिवसेनेवरही पवारांनी टीका केली आहे. आता ऐकायला येतंय की १० रुपयांत जेवणाची थाळी मिळेल. राज्यात कुठे आणि किती ठिकाणी ही थाळी देणार. तुम्हाला राज्य करायला सांगतोय की स्वयंपाक करायला सांगतोय हाच प्रश्न पडलाय. अन्नधान्याचा प्रश्न आहेच, पण त्यासोबतच राज्यात इतर देखील प्रश्न असल्याचं पवारांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS