महिलांच्या कार्यक्रमात शरद पवारांनी घेतला उखाणा, सुप्रिया सुळेंनी दिली दाद !

महिलांच्या कार्यक्रमात शरद पवारांनी घेतला उखाणा, सुप्रिया सुळेंनी दिली दाद !

बारामती – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतलेल्या उखाण्याची चर्चा जोरदार सुरु आहे. इंदापुरातल्या महिलांच्या कार्यक्रमात पवार यांनी उखाणा घेतला आहे. ‘नावाची काय बिशाद, प्रतिभा माझ्या खिशात’ असा  उखाणा पवारांनी घेतला.इंदापूर बाजार समितीच्यावतीने शरद कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला पवार आले होते. यावेळी त्यांनी हा उखाणा घेतला. त्यामुळे चागंलाच हशा पिकला होता.

या महोत्सवात महिलांसाठी विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शरद पवार यांनी महिलांच्या उखाणा स्पर्धेबद्दल आवर्जून विचारलं.  तसेच त्यांनी कार्यक्रमाच्या निवेदिकेला उखाणा घायला लावल. परंतु निवेदीकेचा  लांबलचक उखाणा पाहून त्यावर पटकन नाव घ्या हो.असं म्हणत त्यांनी या निवेदिकेला उखाणा पूर्ण करायला लावला.यावेळी पवारांनी उखाणा कसा सोप्या आणि सरळ भाषेत असावा असं म्हणत ‘नावाची काय बिशाद ; प्रतिभा माझ्या खिशात’ असं हातवारे करत उखाणा घेतला आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकवला.

यावेळी खासदार खासदार सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या.  त्यांनी टाळ्या वाजवत शरद पवार यांच्या उखाण्याला दाद दिली. व आता संध्याकाळी बाबांना घरी आईकडून नो एंट्री होईल.. हे रेकॉर्ड करु नका नाहीतर बाबांना घराबाहेरच झोपावं लागेल असं म्हणाल्या. त्यामुळे उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला होता.

 

COMMENTS