…तर शरद पवारांना कोणती पगडी घालणार ?

…तर शरद पवारांना कोणती पगडी घालणार ?

पुणे – पुणे महापालिकेच्या विस्तारित इमारतीचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. या उद्घाटन सोहळ्याला उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्य शरद पवार याना निमंत्रित करण्यात आलं आहे. या उद्घाटनासाठी येणाऱ्या उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचे स्वागत पुणेरी पगडी घालून करण्याचा निर्णय पुणे महापालिकेने घेतला असल्याची माहिती आहे. त्यामुळे या कार्यक्रमता शरद पवारांना कोणती पगडी घालणार याबाबत सध्या चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनाच्या मेळाव्यात पुणेरी पगडीला फाटा देऊन भविष्यात फुले पगडीच वापरण्याचे आदेश पवारांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिले होते. त्यामुळे आता महापालिकेत पवारांच्या पगडीबाबत चर्चा सुरु असल्याचं दिसत आहे. पवार पालिकेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले तर, त्यांनाही पुणेरी पगडी घालण्यात येणार आहे. मात्र, पुणेरी पगडीद्वारे करण्यात येणारे स्वागत पवार स्वीकारणार का, अशी जोरदार चर्चा रंगली आहे.

दरम्यान या कार्यक्रमात भाजपकडून उपराष्ट्रपतींचे जंगी स्वागत करण्यात येणार असून, पालिकेच्यावतीने पुणेरी पगडी घालून त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. त्यांच्यासोबतच व्यासपीठावर उपस्थित सर्वांनाच पुणेरी पगडी घालण्यात येणार असल्याचं  बोललं जात आहे. महापौर मुक्ता टिळक यांनीही मान्यवरांना पुणेरी पगडी घालण्यात येणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

COMMENTS