नरेंद्र मोदींनी केलेल्या टीकेप्रमाणे आम्ही टीका करणार नाही – शरद पवार

नरेंद्र मोदींनी केलेल्या टीकेप्रमाणे आम्ही टीका करणार नाही – शरद पवार

नवी दिल्ली – जम्मू काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. देशाचे संरक्षण करण्यात 56 इंच छाती असलेल्या पंतप्रधानांना अपयश आलं असल्याची टीका शरद पवार यांनी केली आहे.

‘संपूर्ण देश शहिदांच्या पाठीशी उभा आहे, मात्र राजकारण करण्याची ही वेळ नाही. पुलवामा येथे झालेला दहशतवादी हल्ला चिंताजनक असल्याचंंही पवारांनी म्हटलं आहे.

दरम्यान सध्या परिस्थिती बिकट आहे. नरेंद्र मोदींनी केलेल्या टीकेप्रमाणे आम्ही टीका करणार नाही. सध्या शहीद आणि जखमी जवानांच्या कुटुंबियांच्या मागे उभं राहण्याची गरज असल्याचं शरद पवारांनी म्हटलं आहे.

आत्मघातकी हल्ल्यात ३९ जवान शहीद

तब्बल ३५० किलो स्फोटकांनी भरलेल्या ट्रकद्वारे जैश ए मोहम्मदच्या अतिरेक्याने गुरुवारी पुलवामा जिल्ह्य़ात चढविलेल्या भीषण आत्मघातकी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ३९ जवान शहीद झाले असून २० जखमी झाले आहेत. गेल्या दोन दशकांतील हा सर्वात मोठा हल्ला आहे. या हल्ल्याने देशभर संतापाची लाट उसळली असून या जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, असा गर्भित इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे.

COMMENTS