शरद पवारांच्या नातवाची राजकारणात एन्ट्री, निवडणूक लढवण्याबाबत सूचक विधान !

शरद पवारांच्या नातवाची राजकारणात एन्ट्री, निवडणूक लढवण्याबाबत सूचक विधान !

पंढरपूर  सध्या आपण कार्यकर्ता म्हणून काम करत असून पक्षाने दिलेल्या जबाबदारीनुसार आमदार निवडून आणायचे आहेत. तसंच वरिष्ठांनी आदेश दिल्यास निवडणूक देखील लढवण्यास तयार असल्याचं सूचक विधान शरद पवार यांचे नातून रोहित पवार यांनी केलं आहे. पंढरपूरमधील कार्यक्रमात ते बोलत होते. रोहित पवार हे सध्या पक्ष संघटनेत चांगलेच सक्रिय झाल्याचं दिसत आहे. पुणे तसंच इतर जिल्ह्यामध्ये देखील ते पक्षाच्या कार्यक्रमांना आवर्जून हजेरी लावतात. त्यामुळे आगामी काळात ते राजकारणात सक्रिय होणार असल्याचं दिसत आहे.

दरम्यान यावेळी त्यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावरही टीका केली आहे. जर तुम्हाला हे सरकार जुमलेबाजीचं असं वाटत असेल तर सत्तेतून बाहेर पडा, सत्ता सोडा आणि मंत्र्यांना राजीनामे देण्यास सांगा,अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे. काही दिवसांपूर्वीच पंढपूरमध्ये पक्षाच्या आणि बैठकीसाठी युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे आले होते. आदित्य ठाकरेंनी भविष्यात जुमलेबाजी सरकार येऊ नये असं साकडं विठ्ठलाला घातलं होतं.  त्यांच्या या वक्तव्यावर रोहित पवारांनी टीका केली आहे.

COMMENTS