अखेर गोपीचंद पडळकरांवर शरद पवार बोललेच!

अखेर गोपीचंद पडळकरांवर शरद पवार बोललेच!

सातारा – भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी केलेल्या टीकेवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गोपीचंद पडळकरांना काही महत्व देण्याची गरज नाही, त्यांचं अनेकवेळा डिपॉझिट जप्त केले आहे, कशाला बोलायचं असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. पवार हे आज सातारा दौऱ्यावर असून यावेळी ते बोलत होते. तसेच यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही टोला लगावला आहे. फडणवीस हे काहीही बोलून प्रसिद्ध मिळवत असल्याचंही पवार म्हणाले आहेत.

दरम्यान शरद पवार हे या महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे. कारण गेल्या अनेक वर्षांपासून ते महाराष्ट्राचं नेतृत्त्व करतात. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची भूमिका त्यांची राहिलेली आहे. ही भूमिका यापुढेही ते कायम ठेवतील अशी जोरदार टीका भाजपचे नवनिर्वाचित विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली होती. त्यावर काल पवार यांनी मला बोलायचं आहे, पण आताच नाही, लवकरच सविस्तर बोलेन, असं म्हटलं आहे. त्यानंतर आज गोपीचंद पडळकरांना काही महत्व देण्याची गरज नाही, त्यांचं अनेकवेळा डिपॉझिट जप्त केले आहे, कशाला बोलायचं असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

COMMENTS