‘या’ 10 लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांशी शरद पवार साधणार व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद !

‘या’ 10 लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांशी शरद पवार साधणार व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद !

मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांची जोरदार तयारी सुरु आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतील नेतेही सर्व मतदारसंघाचा आढावा घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्टेरवादीचे अध्यक्ष शरद पवार उद्या 10 लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. या 10 मतदारसंघांमध्ये काँग्रेसकडे असणाय्रा औरंगाबाद मतदारसंघाचाही समावेश आहे.

दरम्यान कोल्हापूर, सातारा, मुंबई, औरंगाबाद, बीड, परभणी, उस्मानाबाद अमरावती, रावेर, जळगाव या मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांशी शरद पवार संवाद साधणार आहेत. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ काँग्रेसने अद्याप राष्ट्रवादीसाठी सोडलेला नाही. तरीही औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीनं निवडणुकीची तयारी सुरु केली असल्याचं दिसत आहे.

COMMENTS