शरद पवार – राज ठाकरे यांनी केला एकाच विमानाने प्रवास !

शरद पवार – राज ठाकरे यांनी केला एकाच विमानाने प्रवास !

औरंगाबाद – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज एकाच विमानाने प्रवास केला. दोन्ही नेते औरंगाबादहून मुंबईला एकाच विमानातून आले. शरद पवार आज औरंगाबादच्या दौ-यावर होते. दुष्काळाबाबत त्यांनी औरंगाबादमध्ये प्रत्रकार परिषद घेतली. त्यांनतर ते मुंबईला परतत होते.  तर राज ठाकरे हे विदर्भाच्या 10 दिवसांच्या दौ-यावरुन मुंबईत परतत होते. त्यामुळे दोन्ही नेत्यांनी एकत्र विमानातून प्रवास केला.

गेल्या काही दिवसांपासून भाजप विरोधात सर्व पक्षांना एकत्र करण्याचा प्रय़त्न राष्ट्रवादी काँग्रेसकडून केला जातोय. मनसेलाही या आघाडीमध्ये घ्यावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही असल्याची चर्चा आहे. त्यापार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांच्या एकत्रित प्रवासामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. दोन्ही नेत्यांचा हा विमान प्रवास निव्वळ योगायोग होती की ठरवून योगायोग साधला होता याविषयी चर्चा सुरू झाल्या आहेत.

COMMENTS