शरद पवारांनी हे करून दाखवले

शरद पवारांनी हे करून दाखवले

जळगाव – काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येऊन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार हे शक्यच नव्हते. कुणालाही याबाबत शक्यता वाटत नसताना मात्र शरद पवारांनी हे करून दाखवले. अरे हे सरकार पाच वर्षे टिकणार आहे हे मला कळलं म्हणून मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलो, असे राष्ट्रवादीचे नेते असं एकनाथ खडसे यांनी म्हटले.

जळगाव येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आणि नगर परिषद, ग्रामपंचायत निवडणुका आणि संघटना बांधणीसाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मह्त्वपूर्ण आढावा बैठक आज आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांची ही पहिलीच बैठक होती.

खडसे म्हणाले, भारतीय जनता पक्ष मी सोडलेला नाही तर पक्षाने मला बाहेर ढकलून दिले आहे. भाजपमध्ये असताना माझा खूप छळ झाला, किती अपमान झाला तरीही मला पक्ष सोडायचा नव्हता. परंतु त्यांनी अशी परिस्थिती निर्माण केली की शेवटी मला पक्ष सोडावा लागला आणि मी बहुजन समाजाच्या या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. भाजपला भीती आहे की आपले 105 आमदारांचे कमी होऊ नये म्हणून आपले आमदार हे दुसऱ्या पक्षात जाऊ नये म्हणून त्यांना टिकवण्यासाठी फक्त त्यांना लहान मुलांसारखे आश्वासन सुरू आहे.

या बैठकीत खडसे यांनी जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस बळकट करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याला सोबत काम करावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

COMMENTS