पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ दोषी, 7 वर्षांची शिक्षा !

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ दोषी, 7 वर्षांची शिक्षा !

पाकिस्तान – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना भ्रष्टाचार विरोधी न्यायालयाने दोषी ठरवले  असून त्यांना अल अजीजिया प्रकरणात दोषी ठरवत ७ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तर फ्लॅगशिप इन्व्हेस्टमेंट प्रकरणात पुराव्यांअभावी त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. याशिवाय त्यांना २.५ मिलियन डॉलरच्या दंडाची शिक्षाही सुनावली असल्यामुळे शरीफ यांना मोठा धक्का बसला आहे.

दरम्यान फ्लॅगशिप इन्व्हेस्टमेंट प्रकरणात आरोपीविरोधात कोणत्याही प्रकारचा खटला दाखल करता येऊ शकत नाही. मात्र, अजीजिया प्रकरणात ते दोषी असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाने आज दिलेल्या या निकालामुळे नवाज शरीप यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.

 

COMMENTS