काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला चक्क एका तरुणाकडून लग्नाचे प्रपोजल !

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला चक्क एका तरुणाकडून लग्नाचे प्रपोजल !

बातमीचं शिर्षक वाचून धक्का बसला असले ना ! मात्र हे खरं आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि केरळचे खासदार शशी थरुर यांना चक्क एका तरुणाने लग्नाचे प्रप्रोजल दिले आहे. दिल्लीमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या कार्यक्रमामध्ये एक तरुण त्याच्या हातामध्ये पोस्टर घेऊन चालत असल्याचं दिसत आहे. त्या पोस्टरवर शशी थरुर मॅरी मी असा मजकूर लिहिण्यात आला आहे. सोशल मीडियातून हे पोस्टर प्रचंड प्रमाणात व्हायरल झालं. त्यानंतर हे वृत्त शशी थरुर यांच्यापर्यंतही पोहचलं. त्यावर हा मुलगा तिरुअनंतपुरम्चा मतदार असता तर फार बरं झालं असतं असे ट्विटने उत्तर दिले. शशी थरुर यांनी ट्विट वरुन दिलेल्या उत्तरावर सोशल मीडियातून त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होतोय. तुमच्या सारख्या संमजस्य आणि शिकलेल्या नेत्यांची देशाला गरज आहे. तुम्ही देशाचे पंतप्रधान व्हायला हवे अशा प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

COMMENTS