…त्यामुळे आमचं काम अधिक सोपं झालं – शशिकांत शिंदे

…त्यामुळे आमचं काम अधिक सोपं झालं – शशिकांत शिंदे

सातारा – साताऱ्यात भाजप आणि शिवसेनेत संवाद नव्हता. उमेदवार शिवसेनेचा की भाजपचा हेच कळत नव्हतं त्यामुळे आमचं काम अधिक सोपं झालं असल्याचं वक्तव्य  उदयनराजे मोठ्य़ा मताधिक्याने निवडून येतील, असं शिंदेंनी राष्ट्रवादीचे कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे यांनी केलं आहे. साताऱ्यात राष्ट्रवादीचे उदयनराजे भोसले विरूद्ध शिवसेनेचे नरेंद्र पाटील असा सामना झाला.

दरम्यान उदयनराजे छत्रपतींचे वंशज आहेत त्यामुळे त्यांना लोकांचे मिळणारे पाठबळ अधिक आहे. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीने साताऱ्यात एकदिलाने उदयनराजेंचं काम केलं आहे आणि सोबतीला त्यांनी जनसामान्यांची सेवा केली आहे. या बळावरच ते दीड ते दोन लाख मतांनी निवडून येतील, असा ठाम  विश्वासही शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

COMMENTS