“भाजपकडून बहूजन समाजातील नेत्यांना संपवण्याचा प्रयत्न !”

“भाजपकडून बहूजन समाजातील नेत्यांना संपवण्याचा प्रयत्न !”

शिर्डी – भाजपकडून बहूजन समाजातील नेत्यांना संपवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप भाजपचे बंडखोर नेते आणि माजी खासदार नाना पटोले यांनी केला आहे. शिर्डी येथे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात नाना पटोलेंनी हा आरोप केला आहे. बहूजन समाजाचे नेते छगन भुजबळ, एकनाथ खडसे आणि नारायण राणेंना राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.

दरम्यान शिर्डीमध्ये एका कार्यक्रमाला शनिवारी नाना पटोले यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीका करत सत्तेचा गर्व करु नका असा सल्ला मुख्यमंत्र्यांना दिला आहे. तसेच भाजपकडून बहूजन नेत्यांना संपवण्याचा प्रयत्न केला जात असून छगन भुजबळ यांना अनेक दिवसांपासून कारागृहात ठेवलं गेलं आहे त्याचबरोबर एकनाथ खडसे आणि नारायण राणेंना देखील राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न भाजप करत असल्याचं पटोले यांनी म्हटलं आहे.

COMMENTS