शिर्डी साईबाबा संस्थानच्या अध्यक्षांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा !

शिर्डी साईबाबा संस्थानच्या अध्यक्षांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा !

मुंबई –  शिर्डी साईबाबा संस्थान ट्रस्टच्या अध्यक्षांना राज्य सरकारकडून राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे. शिर्डी साईबाबा संस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सद्या सुरेश काशिनाथ हावरे हे असून त्यांना राज्य सरकारनं राज्यमंत्रीपदाचा दर्जा दिला आहे. आज घेण्यात आलेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. साईबाबा संस्थान ट्रस्ट देशातील सर्वांधिक श्रीमंत मंदिर ट्रस्टपैकी एक असून या ट्रस्टची वार्षिक उलाढाल ७०० कोटी रुपये इतकी आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी मुंबईतील सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला होता. त्यानंतर सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचा अध्यक्षालाच राज्यमंत्रीपदाचा दर्जा का? असा सवाल राजकीय वर्तुळातून करण्यात आला होता. तसेच शिर्डी येथील साईबाबा संस्थान ट्रस्टच्या अध्यक्षाला राज्यमंत्रीपदाचा का नाही? असा सवाल राजकीय गोटातून सरकारला विचारण्यात आला होता. त्यामुळे शिर्डी संस्थानच्या अध्यक्षांनाही राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्याचा निर्णय सरकारनं घेतला असल्याची माहिती आहे.

COMMENTS