कोरोनाविरोधातील लढ्यासाठी मोदी सरकारचं 1.70 लाख कोटींचं पॅकेज, शेतकय्रांच्या खात्यात दोन हजार तर गृहलक्ष्मींना दिलासा !

कोरोनाविरोधातील लढ्यासाठी मोदी सरकारचं 1.70 लाख कोटींचं पॅकेज, शेतकय्रांच्या खात्यात दोन हजार तर गृहलक्ष्मींना दिलासा !

नवी दिल्ली – कोरोनाविरोधातील लढ्यासाठी 1.70 लाख कोटीचं पॅकेज मोदी सरकारनं जाहीर केलं आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि अर्थराज्य मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची घोषणा केली. यामध्ये देशातील गरिबांसाठी पुढील तीन महिन्यांसाठी 5 किलो गहू/तांदूळ आणि 1 किलो डाळ मोफत मिळणार आहे. याशिवाय पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेतील निधीचा पहिला हप्ता त्वरित देण्यात येणार आहे. त्यानुसार एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत 8.69 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी २ हजार रुपये जमा होणार आहेत. तसेच गरीब महिला-वृद्धांना ५०० रुपये, मनरेेगा रोजंदारी १८२ वरुन २०२ रुपये, दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना 3 महिने मोफत गॅस सिलेंडर आणि नोकरदार आणि मालक यांचा पीएफ भरणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली आहे.

अर्थमंत्र्यांच्या महत्त्वाच्या घोषणा

1) वैद्यकीय कर्मचा-यांना 3 महिन्यांसाठी 50 लाखांचा विमा

2) प्रधान मंत्री अन्न कल्याण योजनेची घोषणा, अन्न कल्याण योजनेंतर्गत, 10 किलो गहू, 10 किलो तांदूळ,1 किलो दाळ मोफत देणार.

3) रोजगार हमी योजनेच्या प्रत्येक मजुराच्या खात्यावर 2 हजार रुपये देणार

4) रोहयो अंतर्गत रोजच्या मजुरीत 182 वरुन 202 रु.पर्यंत वाढ करण्याची घोषणा

5) तीन कोटी ज्येष्ठ नागरिक,विधवा, दिव्यांगांना 1 हजार रुपये सानुग्रह अनुदान

6) आठ कोटी 69 लाख शेतक-यांच्या खात्यात प्रत्येकी 2 हजार रुपये लगेच देणार.

7) दिव्यांगांना 1 हजार रुपयांचे अतिरीक्त सानुग्रह अनुदान देणार

8) जनधन खाते असलेल्या 20 कोटी महिलांना 3 महिने 500 रुपयांचे सानुग्रह अनुदान देणार.

9) दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना 3 महिने मोफत गॅस सिलिंडर

10) आठ कोटी 30 लाख कुटुंबांना उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत 3 महिने मोफत सिलेंडर देणार

11) 63 लाख बचत गटांना 10 ऐवजी 20 लाखांचा व्याजमुक्त
कर्जपुरवठा, 7 कोटी कुटुंबांना लाभ

12) 100 पेक्षा कमी कर्मचा-यांच्या कंपन्यांतील 15 हजारांपेक्षा कमी पगार असलेल्यांचा EPF सरकार 3 महिने भरणार

COMMENTS