ईडी विरुध्द शिवसेना सामना रंगणार

ईडी विरुध्द शिवसेना सामना रंगणार

मुंबई : गेल्या काही दिवसात शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत, आमदार प्रताप सरनाईक कुटुंबियांना ईडीने केलेल्या कारवाईमुळे शिवसेना आक्रमक झाली आहे. त्यामुळेच ईडी विरोधात शिवसेना रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे. येत्या ५ जानेवारीला महाराष्ट्रातून शिवसैनिक मुंबईत दाखल होणार असल्याचं बोललं जात आहे. मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, मिरा भाईंदरमधून बसेस, कारने शिवसैनिक दाखल होणार आहेत.

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यापाठोपाठ शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनाही ईडीची नोटीस आली. ईडीने वर्षा राऊत यांना 29 डिसेंबर चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. परंतु त्यांनी 5 जानेवारीपर्यंत मुदतवाढ मागितली होती. येत्या 5 जानेवारीला वर्षा राऊत ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार आहेत. त्यावेळी अनेक शिवसैनिक त्यांच्यासोबत हजर असतील. एकप्रकारचे शक्तीप्रदर्शन शिवसेनेकडून केले जाणार आहे. यासाठी मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, मिरा भाईंदरमधून शिवसैनिक मुंबईतील ईडीच्या कार्यालयाच्या बाहेर जमणार असल्याचे समजते.

COMMENTS