मुंबईत शिवसेनेच्या माजी नगरसेवकाची हत्या, तीन जण पोलिसांच्या ताब्यात !

मुंबईत शिवसेनेच्या माजी नगरसेवकाची हत्या, तीन जण पोलिसांच्या ताब्यात !

मुंबई – शिवसेनेचे कांदिवली येथील उपविभागप्रमुख आणि माजी नगरसेवक अशोक सावंत यांची हत्या करण्यात आली आहे. रविवारी रात्री  ११.४५ च्या सुमारास तीन ते चार जणांनी मिळून त्यांची हत्या केल्याची सूत्रांची माहिती आहे. हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट असून हत्येनंतर कांदिवली परिसरात तणावाचे वातावरण आहे. शिवसेना नेते, पदाधिकारी ठाकूर कॉम्प्लेक्स कांदिवली पूर्व येथील घटनास्थळी  सोमवारी दिवसभर जमा झाले होते. याप्रकरणी तीन जणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.

दरम्यान अशोक सावंत यांच्यावर तीन ते चार जणांनी हल्ला केला असल्याचं बोललं जात आहे. रात्री ११ च्या दरम्यान त्यांचा पाठलाग करून आशानगर परिसरात गाठण्यात आलं. त्यानंतर त्यांच्यावर 20 ते 25 वार करुन हल्लेखोर पळून गेले. त्यानंतर सावंत यांना ठाकूर कॉम्प्लेक्समधील श्री साई या खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी नेण्यात आलं. परंतु त्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती.

COMMENTS