शिवरायांच्या पुतळ्याच्या उंचीचा वाद पेटला, औरंगाबाद महापालिकेला 19 तारखेचा अल्टीमेटम् !

शिवरायांच्या पुतळ्याच्या उंचीचा वाद पेटला, औरंगाबाद महापालिकेला 19 तारखेचा अल्टीमेटम् !

औरंगाबाद – क्रांतीचौकातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची वाढवण्याचा वाद चांगलाच पेटला आहे. शिवजयंती उत्सव समिती पुतळ्याची उंची वाढवावी अशी मागणी पाच वर्षांपासून करत आहे. मात्र त्यावर महापालिकने कोणतेही पाऊल टाकले नसल्याचा आरोप शिवजयंती उत्सव समितीचे कार्यकर्ते आणि मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी केला आहे. या प्रकरणावरुन आज उत्सव समितीच्या कार्यकर्त्यांनी थेट महापालिकेत घुसून जोरदार घोषणाबाजी करीत महापौर आणि प्रशासनाचा निषेध केला.

शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची ऊंची वाढवण्यासाठी महापालिकेकडे पैसे नसतील तर मराठा क्रांती मोर्चाला केवळ एनओसी द्या, आम्ही काम करू अशी मागणीही मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी केली. येत्या शिवजयंतीला म्हणज्येच १९ फेब्रुवारी रोजी जर महापालिकेने पुतळ्याची उंची वाढवण्याच्या कामाचा शुभारंभ केला नाही तर आम्ही करू असा अल्टीमेटम् त्यांनी दिलाय. गेल्या ५ वर्षांपासून सत्तेत असलेल्या नेत्यांनी पुतळ्याची ऊंची वाढू दिली नसल्याचाही आरोप केल्यानं पुतळ्याचा वाद आता विकोपाला जाण्याची शक्यता आहे.

COMMENTS