आज पुतळा जाळलाय, जिल्ह्यात येतील तेंव्हा त्यांचा ताफा जाळू, शिवसैनिकांचा अजित पवारांना इशारा !

आज पुतळा जाळलाय, जिल्ह्यात येतील तेंव्हा त्यांचा ताफा जाळू, शिवसैनिकांचा अजित पवारांना इशारा !

बीड   शिवसेना आणि राष्ट्रवादीतील वाद आता शिगेला पोहचला असल्याचं दिसत आहे. एकमेकांवरील शाब्दिक टीकानंतर आता शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सामना पेपरच्या प्रती जाळत शिवसेनेचा निषेध केला आहे. तर आज शिवसेनेच्या बीडमध्ये कार्यकर्त्यांनी अजित पवार यांचा पुतळा जाळला आहे.तसेच अजित पवार यांनी बीडमध्ये येऊन दाखवावे. आज त्यांचा पुतळा जाळला जेव्हा अजित पवार येतील तेव्हा त्यांच्यासह त्यांच्या गाड्यांचा ताफा जाळू,’ अशी धमकी शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी दिली असल्याची माहिती आहे.

दरम्यान ‘ज्यांना अद्याप आपल्या वडिलांचे स्मारक बांधता आले नाही, ते राम मंदिर काय बांधणार ?’ असा खोचक सवाल विचारत अजित पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामानाच्या अग्रलेखातून अजित पवार यांच्यावर वादग्रस्त टीका करण्यात आली होती. त्यानंतर ‘शिवसेना सत्तेत आहे की विरोधी पक्षात हे त्यांच्या नेत्यालाही गेल्या साडेचार वर्षात कळलेले नाही.

शिवसेनेची अवस्था बावचळल्यासारखी झाली असल्याचं अजित पवार यांनी टीका केली होती. यामुळेच बीडमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या पुतळा जाळून त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.तसेच आज पुतळा जाळला आहे. ते जिल्ह्यात येतील तेंव्हा त्यांच्याह त्यांचा ताफा जाळू असा इशारा शिवसैनिकांनी दिला आहे.

 

COMMENTS