संजय राऊतांच्या सल्ल्यावर शिवेंद्रराजे भोसलेंचं प्रत्युत्तर !

संजय राऊतांच्या सल्ल्यावर शिवेंद्रराजे भोसलेंचं प्रत्युत्तर !

सातारा – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना थेट शिवाजी महाराजांशी करणारे एक पुस्तक काल प्रकाशित झाले. या पुस्तकावरुन महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे.“छत्रपती शिवाजी महाराजांचे सातारा आणि कोल्हापूरचे वंशज भाजपमध्ये आहेत. नरेंद्र मोदी यांची तुलना थेट शिवाजी महाराजांशी केल्यामुळे त्यांनी राजीनामा देऊन आपली भूमिका स्पष्ट करण्याचा सल्ला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिला होता. त्यांच्या या सल्ल्यावर साताऱ्याचे भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आपली भाषा  जपून वापरावी असा इशारा शिवेंद्रराजे भोसले यांनी दिला आहे.

दरम्यान संजय राऊतांनी भाषा जपून वापरावी. आम्ही सर्वजण त्यांचा मान राखतो. त्यांनीदेखील आमचा मान राखावा”, असे शिवेंद्रराजे म्हणाले. तसेच माझी संजय राऊत यांच्याशी कधीही समोरासमोर भेट झालेली नाही. तुम्ही मोठे नेते असाल. त्याबद्दल काही वाद नाही. पण बोलताना जपून बोलावं एवढीच माझी विनंती आहे. मी वयाने त्यांच्यापेक्षा लहान असल्याचंही शिवेंद्रराजे म्हणाले.

COMMENTS