नुसता डंपर चालवून शहरातील प्रश्न सुटत नाहीत, आमदार शिवेंद्रसिंहराजेंचा उदयनराजेंना टोला !

नुसता डंपर चालवून शहरातील प्रश्न सुटत नाहीत, आमदार शिवेंद्रसिंहराजेंचा उदयनराजेंना टोला !

सातारा – नुसता डंपर चालवून शहरातील प्रश्न सुटत नसल्याच टोला आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी खासदार उदयनराजे भोसले यांना लगावला आहे. सातारा शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या प्रश्नांवरुन शिवेंद्रसिंह राजेंनी हा टोला लगावला आहे. तसेच शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज चक्क साताऱ्यातील मुख्यरस्त्यावरील खड्डे स्वतः भरले आहेत.

दरम्यना खासदार उदयनराजे भोसले यांच्या ताब्यात असलेल्या सातारा नगरपालिकेकडून खड्डे बुजवले जात नसल्याने आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी  स्वखर्चाने साताऱ्यातील नेताजी सुभाषचंद्र भोस चौकातील खड्डे बुजवले आहेत. यावेळी बोलताना शिवेंद्रसिंहराजे यांनी खासदार उदयनराजे यांच्यावर टीका करत नुसता डंपर चालवून शहरातील प्रश्न सुटत नसल्याचा टोला उदयनराजेंना लगावला आहे. काही दिवसांपूर्वीच उदयनराजे यांनी महापालिकेत आलेला नवीन डंपर शहरात स्वतः चालवला होता. याबाबत शिवेंद्रसिंह राजे यांनी टोला लगावला आहे.

COMMENTS