साता-यातील राजकारणाचा दही-वडा होणार, नरेंद्र पाटलांच्या भेटीदरम्यान शिवेंद्रसिंह राजेंचे संकेत ! VIDEO

साता-यातील राजकारणाचा दही-वडा होणार, नरेंद्र पाटलांच्या भेटीदरम्यान शिवेंद्रसिंह राजेंचे संकेत ! VIDEO

सातारा – भाजपचे सातारा लोकसभेचे इच्छुक उमेदवार नरेंद्र पाटील यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेतली आहे. यावेळी चक्क साताऱ्यातील एका हॉटेलमध्ये बसून दोघांनी मिसळ खाण्याचा आनंद घेतला. यावेळी शिवेंद्रसिंह राजे यांना काही प्रश्न विचारण्यात आले. तुम्ही आज दही-मिसळचा आश्वाद घेतला. त्यामुळे साता-यातील राजाकारणाची दही-मिसळ तर होणार नाही ना असा सवाल करण्यात आला. त्यावेळी शिवेंद्रसिंह राजे यांनी साता-यातील राजकारणाचा दही-वडा होणार, दही-मिसळ होणार नाही. असं उत्तर दिलं आहे. त्यामुळे शिवेंद्रसिंह राजे यांचे हे संकेत असल्याचं बोललं जात आहे.

COMMENTS