शिवनेरीवर मुख्यमंत्री आणि मंत्र्यांची पळापळ !

शिवनेरीवर मुख्यमंत्री आणि मंत्र्यांची पळापळ !

पुणे – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रासह देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. शिवजयंतीच्या शिवजन्मोत्सवाचा प्रमुख कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शिवनेरीवर पार पडला. त्यानंतर मुंख्यमंत्र्यांचं भाषण होणार होतं परंतु भाषण न करताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवनेरीवरुन काढता पाय घेतला. तर त्याठिकाणी उपस्थित असलेल्या महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांची पळापळ झाली असल्याचं पहावयास मिळालं आहे. याबाबतचा व्हिडीओ व्हायरलं झाला आहे.

दरम्यान या शिवप्रेमींनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत पंकजा मुंडे आणि विनोद तावडेंना घेरलं होतं. त्यावेळी पंकजा मुंडे यांनी शिवप्रेमींची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याठिकाणच्या शिवप्रेमींचा संताप अनावर झाला आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी देण्यास सुरुवात केली. त्यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त होता. परंतु शिवप्रेमींची आक्रमक भूमिका पाहून विनोद तावडे यांनी काढता पाय घेतला तर त्यांच्यापाठोपाठ पंकजा मुंडेही निघून गेल्या. त्यामुळे आज शिवनेरीवर आलेल्या मंत्र्यांची चांगलीच पळापळ झाली असल्याचं पहावयास मिळाल आहे.

COMMENTS