शिवनेरीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मोठी घोषणा!

शिवनेरीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मोठी घोषणा!

मुंबई – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती सोहळ्यानिमित्त आज शिवनेरी किल्ल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी शिवनेरी परिसराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही. आजच्या आज 23 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.

दरम्यान मी आजवर अनेकदा शिवनेरीवर येवून गेलो, मात्र आजच्या सारखी गर्दी यापूर्वी कधी झाली नाही.रयतेच राज्य आल्याची जनतेची भावना आहे.आपला माणूस मुख्यमंत्री झाला, आपला माणूस मंत्री झाला याचा जनतेला आनंद आहे.मराठा क्रांती मोर्चा दरम्यान दाखल झालेले गुन्हे कायद्याच्या अधीन राहून कसे कमी करता येतील याबद्दल विचार सुरू असून मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकलं पाहिजे याची काळजी घेणार असल्याचंही अजित पवार म्हणाले.

दरम्यान आज आम्ही मुख्यमंत्री, मंत्री म्हणून आलेलो नाही तर शिवभक्त म्हणून आलेलो आहोत, या मातीला वंदन करण्यासाठी आम्ही आलो होतो.ज्यावेळी देशावर हिरव संकट येत होतं, त्यावेळी त्या संकटाला परतवणारा तेजसूर्य या भूमीत जन्माला आला असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. आम्ही आघाडी सरकार म्हणजे वेगवेगळ्या विचारांचे आहोत अशी टीका होते, आमच्या धमण्यांमधील रक्त एकच आहे हे लक्षात घ्या. आमचं सरकार जनतेला आपलं सरकार वाटतं, गोरगरिबांच सरकार आहे म्हणून ही गर्दी आहे. आम्ही इतकी वर्षे दूर होतो, आता आम्ही एकत्र आल्यानंतर एवढी वर्षे उगाच घालवली असं वाटतं, पण आता सगळं चांगलं होईल असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

COMMENTS