दुर्बीणीतून शिवस्मारकाचा शोध, शिवप्रेमींचं अनोखं आंदोलन !

दुर्बीणीतून शिवस्मारकाचा शोध, शिवप्रेमींचं अनोखं आंदोलन !

मुंबई – अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या भूमीपुजनाचा भव्य कार्यक्रम होऊन एका वर्षापेक्षा जास्त कालावधी गेला आहे. त्यामु़ळे शिवजयंतीनिमित्त काही शिवप्रेमी तरूणांनी मुंबईतील मरीन ड्राईव्ह येथे अनोखं आंदोलन केलं आहे.  या शिवप्रेमींनी कागदाच्या दुर्बीण घेऊन शिवस्मारक पाहण्याचे नागरिकांना व शिवप्रेमींना आवाहन करून अनोखे आंदोलन केलं आहे.

दरम्यान शिवस्मारकाच्या भूमीपूजनाचा भव्य कार्यक्रम पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पडला. परंतु  शिवस्मारकाच्या कामाला अजून सुरुवातही केली नसल्यामुळे शिवप्रेमींकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यासाठी सरकारविरोधात अनोखं आंदोलन करुन या शिवप्रेमींनी कागदी दुर्बीण बनवून शिवस्मारक पाहण्याचं नागरिकांना आवाहन केलं आहे.

 

 

COMMENTS