मध्य प्रदेशात भाजपला आणखी एक धक्का, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या मेहुण्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश !

मध्य प्रदेशात भाजपला आणखी एक धक्का, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या मेहुण्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश !

नवी दिल्ली – मध्य प्रदेशात भाजपला आणखी एक धक्का बसला असून मुख्यमंत्री शिवराज सिंह यांच्या मेहुण्यानं आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर संजय मसानी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसच्या प्रचार समितीचे प्रमुख ज्योतिरादित्य सिंदिया आणि प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांच्या उपस्थितीत संजय मसानी यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे भाजपला हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.

दरम्यान संजय मसानी शिवराज सिंह चौहान यांच्या पत्नी साधना सिंह यांचा भाऊ आहे. मध्य प्रदेशला आता शिवराज सिंह चौहान यांची गरज नसून कमल नाथ सारख्या नेत्याची आवश्यकता आहे. शिवराज सिंह चौहान यांची सत्तेतील तेरा वर्ष हा खूप मोठा काळ आहे. आता दुसऱ्या कुणाला तरी संधी मिळाली पाहिजे असे संजय मसानी नवी दिल्लीतील काँग्रेस कार्यालयात पत्रकारांशी बोलताना म्हटलं आहे.

COMMENTS