आता शिवसैनिकांच्या बोटात दिसणार वाघाची अंगठी !

आता शिवसैनिकांच्या बोटात दिसणार वाघाची अंगठी !

मुंबई – शिवसैनिकांना एकत्र ठेवण्यासाठी हल्ली त्याच्या हातात शिवबंधन बांधले जाते. इतर पक्षातून शिवसेनेत प्रवेश केलेल्यांच्या हातातही प्रवेशावेळी शिवबंधन बांधले जाते. आता त्याच्यापुढे जाऊन शिवसैनिकांच्या हातात वाघाची अंगठी दिसली तर नवल वाटू नये. कारण शिवसेनेच्या कुलाबा विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांना वाघाच्या अंगठीचे वाटप करण्यात येणार आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब टाकरे यांच्या जयंतीनिमित्त कुलाबा विधानसभा मतदारसंघात वाघाची अंगठी वाटप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.

आता शिवबंधनाने शिवसैनिकांना किती प्रमाणात एक बंधनात ठेवले किंवा त्याचा पक्षाला किती फायदा झाले हे आजपर्यंत आपण पाहिले आहेच. आता या वाघाच्या अंगठीचे सगळीकडे वाटप होणार का ? आणि झालेच तर वाघाचे बळ शिवसैनिकात येणार का ? हे आगामी काळात आपल्याला दिसून येणार आहेच.

COMMENTS