मुंबईत शिवसेनेला जोरदार धक्का, अनेक पदाधिका-यांचा मनसेत प्रवेश !

मुंबईत शिवसेनेला जोरदार धक्का, अनेक पदाधिका-यांचा मनसेत प्रवेश !

मुंबई – शिवसेनेचे नगरसेवक दिलीप लांडे यांच्या गटाला सुरूंग लागला असून त्यांच्या चांदिवली विभागातील शेकडो शिवसैनिकांनी मंगळवारी मनसेत प्रवेश केला. चांदिवलीतील प्रभाग क्र. १५८चे शिवसेनेचे माजी शाखाप्रमुख सागर तुळसकर यांच्यासह अनेक शिवसेना, युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.

दरम्यान चांदिवलीतील प्रभाग क्रमांक १५६, १५७ आणि १५८ मधील शिवसेनेचे माजी शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, माजी गटप्रमुख, युवा शाखा अधिकारी, अनेक युवा सैनिक तर महिलांमध्ये माजी युवा शाखा अधिकारी वर्षा ऊनवरकर, माजी उपशाखा संघटन गायत्री पई आदी महिला शिवसैनिक, पदाधिका-यांनी मनसेत प्रवेश केला आहे. त्यामुळे या प्रभागामध्ये मनसेची ताकद वाढली असल्याचं दिसत आहे.

COMMENTS